रूप साजिरे गोजिरे.Information

 

गणेशोत्सवाची सुरुवात होण्यापूर्वी मूर्तिकारांची गणेश चित्रशाळेत मूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवत असतानाची छायाचित्रं घेण्याचा मोह आवरता येत नाही. गणेशमूर्तीच्या चेह-यावरील भावमुद्रा कॅमे-यात टिपणं म्हणजे एक पर्वणी असते. साजि-या गोजि-या गणेशाची अनेक रूपं थक्क करणारी. लोअर परळ येथील मूर्तिकार विशाल शिंदे यांच्या हातांमधून साकारलेल्या अनेक वैशिष्टयपूर्ण मूर्ती गणेशाची अशीच नाना रूपं साकारतात.