Information
प्रसिद्ध, अप्रसिद्ध मंदिरे पाहून मला दुर्ग-गणेशची संकल्पना सुचली. जरी बहुतांश गडांवर महादेव किंवा भवानीमातेची मंदिरे आढळत असली तरी गणराय देखील काही ठिकाणी आपल्या भक्तांना दर्शन देत असतात सर्व भटक्यांनी देखील आपल्याकडे असलेली दुर्ग गणेशांची प्रचि पाठवाव्यात जेणेकरून एक सुंदर असे संकलन करता येईल...
धन्यवाद...www.puneganeshfestival.com
1पहिले बाप्पा.. कुलाबा किल्ल्यावरील..अलिबागच्या जवळील या किल्ल्यात सिद्धिविनायकाचे प्रसिद्ध मंदिर आहे. आजही मोठ्या प्रमाणावर भाविक इथे भेट देतात. दीड फूट उंचीची ही संगमरवरी मूर्ती अतिशय लोभसवाणी आहे. राघोजी आंग्रे यांनी हे मंदिर बांधले असे म्हणतात.
2काळ्या संगमरवरातील गणेशमूर्ती...कोल्हापूरजवळी
विशेष म्हणजे माझ्या पाहण्यात महादेव मंदिरात सहसा गणेश आढळलेले नाहीयेत पण इथे आपल्या वडीलांबरोबर आपले स्थान राखून आहेत.
3.सिध्धगड माचीवरील बाप्पा ...
4.राजगडच्या सुवेळा माचीवर विराजमान झालेल्या या बाप्पांना वंदन करून मगच राजगडची फेरी पूर्ण होते...सर्वसाधारणपणे माची किंवा पहार्याच्या ठिकाणी मारूती आढळतो पण गणेश अपवादानेच आढळतात.
5.हरिश्चंद्रगडा
एक प्रसिद्ध गणेशमूर्ती
6.हरिश्चंद्रगडावर अत्यंत अनघड ठिकाणी बांधलेल्या सुबक हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या आवारात विराजमान झालेली...आणि ही तिथून जवळच असलेल्या गुंहेत...या गुहेला नावच गणेश गुहा आहे. दुर्ग गणेश मध्ये आकाराने सर्वात मोठा.
7.राजमाची...किल्लेदाराचा वाडा...
8.वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी.. मारुती-गणेश जोडगोळी..
9.जयगड -( जि. रत्नागिरी) किल्ल्यातिल गणेश
10.रेतीचा गणेश-सिंधुदुर्ग किल्ला