महाकाय महाधिपती बिर्ला गणेश

महाकाय महाधिपती : पुण्याजवळ सह्याद्रीच्या डोगररांगांत विशाल १ हजार टन वजनी मूर्ती, तांब्याचा मुलामा

जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत साेमाटणे फाटा येथे सह्याद्रीच्या डाेंगररांगांत सरला बसंतकुमार बिर्ला यांच्या संकल्पनेतून ७२ फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती साकारण्यात अाली आहे. तिचे वजन १ हजार टन असून ती जगातील सर्वाधिक वजन असलेली गणेशमूर्ती म्हणून ओळखली जाते. सिमेंट काँक्रीट, स्टील, तांबे वापरत मूर्ती उभारण्यासाठी अडीच वर्षे लागली. जानेवारी २००९ मध्ये प्रतिष्ठापना झाली. मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पायथ्यापासून एकूण १७९ पायऱ्या चढून जावे लागते. दर ४ वर्षांनी मूर्तीवर तांब्याचा लेप लावून तिला नवी झळाळी देण्यात येते.

सकल गुण आणि गणांचा अधिपती श्रीगणेशाचे आज मोठ्या थाटात आगमन होत आहे. हा आहे पुण्याजवळ,  ७२ फूट उंच आणि जगातील सर्वाधिक एक हजार टन वजन , सह्याद्रीच्या डोंगररांगांत आणि निसर्गाच्या कुशीत विराजमान असलेला बिर्ला गणेश.

 

कसे जायचे

 

पुण्यापासून ३० किमी लोणावळ्याच्या दिशेने, जुन्या पुणे-मुंबई हायवेवर. सोमाटणे फाटा, तळेगाव टोल नाक्याजवळ.

उंची, लांबी-रुंदीची बेरीज होते नऊ

उंची, लांबी, रुंदीची बेरीज ‘९’ येईल, अशा पद्धतीने मूर्ती उभारली आहे. जवळ ‘ॐ गं गणपतये नम:’ हा बीजमंत्र काेरण्यात आलेला असून त्याची बेरीजही ‘९’ आहे.

 

७२ फूट उंची (७+२ = ९)
१८ फूट उंच ओटा (१+८ = ९)

४५ फूट लांब ओटा
(४+५ = ९)
५४ फूट रुंद ओटा 
(५+४ = ९)

१६ एकर परिसर

Tags :