पार्वतीनंदन | खिंडीतला गणपती

स्वातंत्र्यलढ्यातील भागीदार खिंडीतला गणपती 
पुण्यातील गणेशखिंडीत चतुश्रुंगी देवी मंदिरापासून जवळ 'पार्वतीनंदन' किंवा 'खिंडीतला गणपती' आहे. खिंडीत असल्याने कदाचित असे नाव पडले असावे. ते एक प्राचीन देवस्थान असल्याचे समजते. शेंदूरचर्चित डाव्या सोंडेची चतुर्भुज गणेशमूर्ती येथे आहे. इ. स. १८९७ मध्ये चाफेकर बंधूंची खलबते या मंदिरात होत असत. चाफेकर बंधूंनी रँडचा खून झाल्यावर 'खिंडीतला गणपती नवसाला पावला' असा सांकेतिक निरोप लोकमान्य टिळकांना आपल्या सहकाऱ्यांना पाठवला होता. या मंदिराचा इतिहास असा की राजमाता जिजाऊंना साक्षात्कार झाल्यामुळे हे मंदिर बांधण्यात आले. अशी आख्यायिका सांगितली जाते. पुढे पेशवाईत शिवरामभट चित्राव यांनी त्यांना येथे सापडलेल्या गुप्तधनातून जीर्णोद्धार केला, असे ही कळते. पेशवे मंडळी मोहिमेवर जाताना येथील गणपतीचे दर्शन घेत असत. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने या गणपतीपुढे दक्षिणा ठेवल्याची नोंद आहे.

Tags :

#KhinditlaGanpati #PuneGanpati #Penganpati #Puneganeshfestival