यंदाचा गणेशोत्सव आम्ही कसब्यात साजरा करत आहोत. मात्र, पुढीलवर्षीचा गणेशोत्सव श्रीनगरमधील गणपतयार या प्राचीन मंडळात साजरा करू

आम्ही मूळचे काश्मीरचे असूनही, कलम ३७०मुळे आम्हाला सण, परंपरा जपता येत नव्हती. गेल्या तीस वर्षांपासून ही खंत मनाला टोचत होती. आता मात्र, हे जाचक कलम रद्द झाल्याने आमच्या दबलेल्या भावनांना, उत्साहाला, जल्लोषाला वाट मिळणार आहे. यंदाचा गणेशोत्सव आम्ही कसब्यात साजरा करत आहोत. मात्र, पुढीलवर्षीचा गणेशोत्सव श्रीनगरमधील गणपतयार या प्राचीन मंडळात साजरा करू,' असा विश्वास पुण्यात वास्तव्यास असलेल्या काश्मिरी पंडितांनी व्यक्त करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पुणेकरांप्रमाणेच 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर करून पुन्हा एकदा काश्मीरमध्ये स्थायिक होण्याची संधी मिळावी, असे साकडेही त्यांनी गणरायाला घातले. 

पुणे-काश्मीर सांस्कृतिक मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात सरदार विंचुरकर वाड्यातील गणेशाची प्राणप्रतिष्ठा काश्मिरी पंडितांचे कुटुंबीय आणि पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आली. काश्मिरी पंडितांच्या हस्ते विधिवत बाप्पांना विराजमान करण्यात आले. या वेळी उपस्थित पंडितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संस्कृतचे ज्येष्ठ अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, शिवसेनेचे नेते श्याम देशपांडे, काश्मिरी पंडितांना एकत्र बांधून ठेवणारे राहुल कौल, सारंग गोसावी, सचिन गाडगीळ, उत्तम भेलके, गजानन थरकुडे, सरदार विंचुरकर यांचे वंशज नारायणराव विंचुरकर, देवेंद्र सिंग यांच्यासह शेकडो काश्मिरी पंडित विद्यार्थी आणि नागरिक या वेळी उपस्थित होते. ज्ञानप्रबोधिनी आणि शिवगर्जना पथकांच्या एकत्रित वादनाने मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत काश्मिरी विद्यार्थ्यांनी फेर धरून जल्लोष केला. 'गणपती बाप्पा मोरया' आणि 'भारत माता की जय' अशा घोषणा देऊन त्यांनी आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी त्यांनी काश्मिरी भाषेतील गणेशाच्या भजनेही गायली. 

जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीर आणि पुण्याचं नातं दृढ व्हावं यादृष्टीने पुणे काश्मिरी सांस्कृतिक मंच यांच्या वतीने कसबा पुणे गणपतीयार अंतर्गत आज पुण्यातील विंचूरकरवाड्यात एकत्र आले होते. विंचूरकरवाड्यात शहरातील काश्मिरी मंडळी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची मूर्ती विराजमान झाली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, सरदार विंचूरकर यांचे दहावे वंशज नारायणराव विंचूरकर, जनरल जोरावर सिंग यांचे पाचवे वंशज देवेंदर सिंग आणि दीक्षाजी कुलरिया, रास्व संघाचे महानगर कार्यवाह महेशजी , पंडीत वसंतराव गाडगीळ , वासुदेव शास्त्री , करपे ,शाम देशपांडे, पराग ठाकूर , अजय भोसले , मिलींद एकबोटे, हेमंत जाधव , सारंग गोसावी , सचीन गाडगीळ , गजानन थरकुडे , तुषार माढीवाले ,स्वप्निल नाईक , राहूल कौल , रोहीत भट , विभागीय पासपोर्ट अधिकारी आनंद ताकवले , उत्तमराव भेलके , समिर देसाई 
उपस्थित होते. कार्यक्रमात जम्मू काश्मीर येथील तरूण आणि तरुणीयावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते .
काश्मीर मधील जनतेला शिक्षणाच्या आणि विकासांचे सर्व सुविधा मिळावयास आम्ही कटीबदघ आहोत असे अश्वसत केले 
आतंकवाद , अलगाववाद , कट्टरतावाद या विरोधात लढण्यास काश्मीरी बांधवासमवेत आम्ही आहोत अशी सर्वांनी शपथ घेतली

 

'गणपतराय हे काश्मीरमधील प्राचीन गणेश मंदिर आहे. या मंदिरात पूर्वी विधिवत पूजा होत असे. गणेशोत्सवाच्या काळात गणपतीची प्राणप्रतिष्ठा होऊन विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असत. मात्र, कलम ३७०मुळे ही परंपरा नाहीशी होऊ लागली. काश्मिरी पंडितांनी येनकेनप्रकारेन ही परंपरा जपण्याचा प्रयत्नही केला. आता पुन्हा ती परंपरा आम्हाला सुरू करता येणार असून, पुढील वर्षी आम्ही सर्व जण त्या ठिकाणी जाऊन गणेशोत्सव साजरा करणार आहोत,' असा विश्वास काश्मिरी तरुण-तरुणींनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला. 

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture