स्त्री आधार केंद्राच्या वतीने महिला कार्यकर्त्यासाठी गणेशोत्सव महिला सुरक्षितता स्वयंसेवकांना प्रशिक्षण कार्यक्रम

स्त्री आधार केंद्र हि सामाजिक संस्था १९८४ पासून महाराष्ट्रात महिलांच्या प्रश्नांवर काम करत आहे.संस्थेतर्फे महिलांना कायदेविषयक मदत, मार्गदर्शन तसेच समुपदेशन केले जाते. अनेकवेळा अत्याचाराच्या घटना हाताळताना कायदा व सामाजिक जवाबदारी या दृष्टीकोनातून स्त्री कार्यकर्त्या म्हणून महिलांची बाजू मांडताना सक्षमता यावी या  हेतूने स्त्री आधार केंद्राने महिलांसाठी स्वमदत गट तयार केले आहेत. महिलांना कायदेविषयक प्रशिक्षण दिले आहे. दरवर्षीप्रमाणे या  वर्षी हि गणेश उत्सव व नवरात्र उत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महिला स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी “महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण व  ओळखपत्र वितरण” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
 
सध्या पुणे व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिला,मुले व बालके यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गणेश उत्सव काळात बाहेर गावाहून येणाऱ्यांची संख्या जास्त असते. चोरी, महिला व मुलींची छेडछाड, बालकांचे अपहरण, बालके हरवणे असे प्रकार घडतात. अशातच हरवलेल्या बालकांना पोलिसांच्या स्वाधीन न करता बालकांची तस्करी व बाल लैगिंक अत्याचाराच्या घटना घडण्याची शक्यता दिसुन येते. या महिला स्वयंसेवकाचे महिला, मुली, बालकांचे अश्या घटनापासून संरक्षण होण्यासाठी मदत होईल. ऑनर किलिंगच्या घटना सातत्याने घडत असतांना दिसत आहे. नव्याने तिहेरी तलाक कायदा झाला आहे. 
 
तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचे होणारे शोषण यावर स्त्री आधार केंद्रच्या वतीने महिलांमध्ये डिजिटल साक्षरता विषयक कार्यशाळा घेण्याची योजना आखली आहे. याप्रकारच्या विविध आव्हानांची ओळख करुन देऊन कार्यकर्त्या़ंचा दुवा मजबूत करणे हा या कायदेविषयक  या कार्यक्रमाचा हेतु आहे. स्त्री आधार केंद्रातर्फे पुणे शहर परिसरातील २० पोलीस स्टेशनच्या  अखत्यारीतील ५० महिलांना स्त्री आधार केंद्राची ओळखपत्र दिली जाणार आहे. महिला स्वयंसेवक पोलिस व गणेश मंडळाच्या साहाय्यने काम करतील. 
 
गेल्या वर्षी हरवलेल्या मुलांना/मुलीना स्त्री आधार केंद्राच्या स्वयंसेवकांनी गणेश मंडळाच्या सहकार्याने योग्य ते मार्गदर्शन केले.ऊदा. स्वारगेट पोलीस ठाण्या अंतर्गत काम करणाऱ्या महिला दक्षता समितीच्या कार्यकर्त्यांनी मुलीनी व तरुण मुलांना एकत्र करून ज्या मुला-मुलीना चांगल्या प्रकारे पोहता येते अशा तरुण मुला-मुलींचे ग्रुप तयार केले आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी कॅनाॅलच्या दोन्ही तीरावर गणपती विसर्जन करण्यास गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना सहकार्य केले.  गर्दीच्या ठिकाणी गणेश दर्शन व देखावे पाहण्याकरिता जमलेल्या स्त्री-पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा लावून महिलांना धक्का-बुक्की व छेडछाड न होता दर्शन घेता येईल असाही प्रयत्न केला जातो आहे. हा ऊपक्रम गेली १२वर्षे पुण्यात राबवला जातो आहे.
 
स्त्री आधार केंद्राच्या वतीने प्रशिक्षण २२ ऑगस्ट २०१९ रोजी सुमित्रा सदन, रागे पाथ, मॉडेल कॉलोनी, शिवाजी नगर, पुणे येथे दुपारी २ ते सायं ५ वा होणार आहे. यासाठी दि ९ शुक्रवार व २२ ऑगस्ट २०१९ , गुरुवार रोजी स्त्री आधार केंद्र धायरी, गणेशनगर, लेन नं/ २९, पुणे-४१ येथे ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे. त्यांनी ०२०-२४३९४१०३/२४३९४१०४ या क्रमांकावर संपर्क करावा. सर्व महिला कार्यकर्त्यासाठी ‘महिला सुरक्षितता स्वयंसेवक ओळखपत्र वितरण” दि. २९ ऑगस्ट २०१९ रोजी सुमित्रा सदन, रागे पाथ, मॉडेल कॉलोनी, शिवाजी नगर, पुणे महाराष्ट्र 411016येथे दुपारी ३ वा वाजता होणार आहे. या कार्यक्रमात स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा ना. डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
 

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture