पुण्यातील प्रसिद्ध नवसाला पावणारा दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीचा इतिहास

ण्यातील प्रसिद्ध नवसाला पावणारा दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीचा इतिहास …
गणेशोत्सव म्हटला की मोठ्या शहरांतील काही गणपतींची नावे विशेषत्त्वाने समोर येतात. त्यामध्ये पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे नाव आघाडीवर आहे. बाहेरगावहून पुण्यात आलेला व्यक्ती दगडूशेठच्या दर्शनासाठी गेला नाही असे फारच क्वचित घडत असावे. केवळ गणेशोत्सव साजरा करण्यापुरते नव्हे तर, श्रद्धेपोटी समाजाने दिलेल्या पैशातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून मानवतेचे महामंदिर उभारण्याचा प्रयत्न करणारे 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट' हे मंडळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपतीने जगभरात नावलौकिक संपादन केला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे. या मंडळाची स्थापना १८९३ मध्ये झालेली असून, 'दगडूशेठ गणपती' हा लौकिक प्राप्त झाला आहे.

सन १८९३ :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक
सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही व्यथीत झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण
श्री दत्त महाराज व श्री गणपतीची मुर्ती तयार करा व त्याची रोज पुजा करा व ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्वल करतील.
महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी श्री दत्त महाराजांची एक संगमरवरी व श्री गणपतीची मातीची मुर्ती बनविली .
सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक
गणेशोत्सवाची सुरूवात केली. दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतू त्यांनी निर्माण केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी,
तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती कै. श्री. दगडूशेठ हलवाई बाहूलीचा हौद, सार्वजनिक गणपती म्हणून प्रचलित होता.

सन १८९६ साली तयार केलेल्या मुर्तीची थोडी जीर्ण अवस्था झाली होती व सन १९६७ साली गणपती बाप्पाच्या अमृत महोत्सव साजरा झाला. तेंव्हा ब-याच कार्यकर्त्यांनी नविन गणपतीची मुर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकमधील धारवाडचे विश्वब्राम्हण कुळातील सामवेद शाखेतील प्रसिद्ध शिल्पकार, आणि यंत्रविद्येचे अभ्यासक श्री. शंकराप्पाचार्य पंडित आणि त्यांचा मुलगा नागलिंगचार्य शिल्पी पंडित यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मुर्ती नमुना म्हणून करून घेतली व सर्व कार्यकर्त्यांना दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मुर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यावर प्रत्यक्ष मोठया मुर्तींचे काम सुरू झाले. ती घडविताना मुलगा श्री नागलिंगचार्य शिल्पी पंडित) यांचेही या कामात योगदान होते.
ही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असताना त्यावेळी ३६५ वर्षांनंतर येणारे सूर्यग्रहण आले होते. त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मुहूर्तावर गणेशमूर्तीमध्ये गणेशयंत्र बसविले तर त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी श्री. नागलिंगाचार्य शिल्पी पंडित यांची श्रद्धा होती. त्यांच्या श्रद्धेचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आदर केला आणि त्यानुसार

संपूर्ण मुर्ती तयार झाल्यानंतर श्री. शंकराप्पाचार्य शिल्पी पंडित यांनी त्याकाळी जे 365 वर्षांनंतर येणारे ग्रहण होते त्या दिवशी पुण्याच्या संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची मंत्र जप करून आराधना केली. श्री. गणेशयंत्राची पुजा केली व त्यानंतर ज्याठिकाणी मातीची मुर्ती तयार केली, त्या ठिकाणी येऊन विधीवत धार्मिक गणेशयाग करून स्वतः प्राणप्रतिष्ठा केली व ते सिध्द श्रीयंत्र मंगलमुर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. या मंगलमुर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पुजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. आजतागायत हे सर्व अत्यंत निठेने व प्रामाणिकपणे सुरू आहे व त्यामुळे आपणा सर्वांना त्या गणपती बाप्पाचे आर्शिवाद लाभले आहेत. अशा प्रकारे सध्या गणपती मंदिरात असलेली श्रींची सर्वांग सुंदर,नवसाला पावणारी व त्याकाळी सन 1968 मध्ये सुमारे ११२५/- (एक हजार एकशे पंचवीस रूपये) ही मुर्ती बनविण्याचा खर्च आला होता.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती तयार करणारे विश्वब्राम्हण कुळातील प्रसिद्ध शिल्पकार कै. शंकराप्पाचार्य आणि त्यांचा मुलगा कै नागलिंगाचार्य शिल्पी पंडित यांचा मुलगा वंशज श्री योगेश आचार्य पंडित रा. निगडी प्राधिकरण पुणे येथे प्रसिद्ध उद्योजक असून सुवर्णपुष्प संस्थेचे अध्यक्ष आहेत . त्यांचे वडिल कै. नागलिंगाचार्य शिल्पी पंडित यांनी मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून पदवी मिळवली होती त्या नुसार पेंटिंग आणि शिल्पशास्त्रात विशेष प्राविण्य मिळवले होते. त्यानी पुण्यातील गणपती मध्ये दगडूशेठ ,जिलब्यामारुती ,जगोबादादा तालिम ,निंबाळकर तालिम , नारायण पेठ , विजय टाॅकिज , माती गणपती , मोदि गणपती , गरुड गणेश, मार्केट यार्ड शारदागणेश , तळेगाव , सासवड असे १३ गणपती बनवले आहेत तसेच साधू वासवानी चौकातील वासवानी यांचे एक स्टॅचू सेंट मिराज शाळेत मध्ये असे इतरत्र भारतभर ब्राॅन्झ पितळी मुर्त्या वडिलांनी बनवल्या त्यात झाशीच्या राणी बेंगलोर , महात्मा गांधी बेंगलोर विधानपरिषद, धारवाड , कित्तूर चंन्नम्मा राणी कित्तूर , वीरभद्र, शिवप्पन नायक शिमोगा तसेच परदेशातही अनेक मुर्त्या बनवून गेलेल्या आहेत.

शिल्प शास्त्र, आगम शास्त्र,ज्योतिष शास्त्र यांचे ज्ञान असल्याने मूर्ती करताना या सर्व स्थितीचा अभ्यास करून प्राणप्रतिष्ठापना करताना दगडूशेठ मूर्तीत ५ यंत्र बसवण्यात आली, त्याचे कारण म्हणजे मुहुर्ताच्या वेळी अष्टग्रह योग आलेला होता,हा योग दर ३६० वर्षांनी येतो म्हणून हि यंत्र या तिसऱ्या मूर्तीत बसवण्यात आली. या बाप्पाची सुरवातीची पूजा शंकराप्पा आचार्य शिल्पी पंडित यांच्या हस्ते करावी हि नागेश शिल्पी यांनीं सुचवले. पूजा करताना मंत्र उच्चार म्हणत असलेले शंकराप्पा आचार्य नारळ फोडण्यासाठी खाली वाकले तेव्हाच आपोआप नारळ फुटला हा शुभसंकेत होता अशी माहिती  कै. नागेश शिल्पी यांचे पुत्र आनंद नागलिंग  आचार्य शिल्पी  यांनी दिली.

अथर्ववेदाचा उपवेद असलेल्या शिल्पवेदlनुसार धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडविण्यात आली. शांत, प्रसन्न आणि पाहताच पावले थबकून राहावीत असे भाव या मूर्तीच्या चेहऱ्यावर आहेत. बैठय़ा मूर्तीचे चारही हात सुटे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे, तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणारा आहे. अन्य दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुगूट आहे. मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम हाही उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहे. या मूर्तीचे डोळे हे महत्त्वाचे वैशिष्टय़. या डोळ्यांमध्येच मूर्तीची प्रसन्नता, सात्त्विकता आणि उदात्तता एकवटली आहे. कोठूनही पाहिले तरी गणपती आपल्याकडेच पाहात आहे याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकाला येते. मूर्तीच्या बोलक्या डोळ्यांमधून व्यक्त होणारे भाव पाहून भक्त नकळतच नतमस्तक होतो.
उत्सव काळात पाच किंवा अकरा नारळाचे तोरण अर्पण करणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी लागलेली रांग हे दगडूशेठ गणपतीचे एक खास वैशिष्टय़ ठरले.
'कुली' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता. सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन या दांपत्याने सोन्याचे कान अर्पण केले होते. पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर २००२ मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले.
ट्रस्टच्या तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती सध्या नेतृत्वाचे सुकाणू आहेत. त्यांनीही त्याच निष्ठेने आणि भाविकतेने सारे उपक्रम सुरू ठेवत गणपतीचे पावित्र्य जपले असून ट्रस्टच्या लौकिकामध्येही भर घातली आहे.
ट्रस्टतर्फे दरवर्षी सादर केला जाणारा देखावा आणि त्याची विद्युत रोषणाई हा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रिबदू असतो.

Information Thanks -आनंद नागलिंग  आचार्य शिल्पी

 

 रविंद्र म. बारस्कर (वेदपाठक )औरंगाबाद.

Tags :