आंध्रप्रदेशातील या गणेश मंदिरात दररोज वाढत आहे मूर्तीचा आकार

श्रीगणेशाच्या चमत्काराच्या विविध कथा पुराणांमध्ये वर्णीत आहेत आणि आजही त्यांचे चमत्कार पहावयास मिळतात. यातीलच एक चमत्कार चित्तूरच्या कनिपक्कम गणपती मंदिरात दररोज पहावयास मिळतो. श्रीगणेशाचे एक मंदिर विविध कारणांमुळे अद्भुत आणि चमत्कारिक मानले जाते. या मंदिरातील गणेश मूर्तीचा आकार दररोज वाढत असल्याचे स्थानिक सांगतात. आंध्रप्रदेशातील चित्तूर येथे एका नदीच्या मधोमध असलेल्या मंदिरात श्रीगणेशाची मूर्ती विराजमान आहे. मान्यतेनुसार येथे येणाऱ्या भक्तांच्या सर्व अडचणी श्रीगणेश लवकर दूर करतात.

दररोज वाढत आहे गणेश मूर्ती
स्थानिक मान्यतेनुसार येथील गणेश मूर्तीचा आकार दररोज वाढत आहे. या गोष्टीचा पुरावा मूर्तीचे पोट आणि गुडघा असून हे दररोज वाढत आहेत. असे सांगितले जाते की, एक भक्त श्री लक्ष्माम्मा यांनी एक कवच अर्पण केले होते, परंतु मूर्तीचा आकार वाढल्यामुळे आता हे कवच मूर्तीला घातले जात नाही.


अशी झाली या मंदिराची स्थापना
या मंदिराची निर्माण कथा अत्यंत रोचक आहे. कथेनुसार या ठिकाणी तीन भाऊ वास्तव्यास होते. या तिघांमधील एक मुका, दुसरा बहिरा आणि तिसरा अंध होता. तिघांनीही उदरनिर्वाहासाठी एक जमिनीचा तुकडा विकत घेतला होता. जमिनीवर शेती करण्यासाठी पाण्याची गरज होती. यामुळे तिघांनीही या ठिकाणी विहीर खोदण्याचे काम सुरु केले. काही काळानंतर जमिनीतून पाणी निघाले. त्यानंतर आणखी खाली खोदल्यानंतर एक दगड दिसून आला. तो दगड काढल्यानंतर तेथून रक्ताची धार निघाली. थोड्याचवेळात संपूर्ण पाणी लाल झाले, त्याचबरोबर एक चमत्कारही झाला. त्या तिघांना तेथे श्रीगणेशाची मूर्ती दिसली. या मूर्तीचे दर्शन घेताच तिन्ही भावांचे अपंगत्व दूर झाले. ही बातमी गावातील रहिवाशांना समजताच ते सर्वजण हा चमत्कार पाहण्यासाठी तेथे गोळा झाले. त्यानंतर सर्व लोकांनी प्रकट झालेल्या गणेश मूर्तीची तेथे पाण्यातच स्थापना केली. त्यानंतर 11 व्या शतकात चोळ राजा कुलोतुंग चोळ प्रथम यांनी या मंदिराचे निर्माण केले.

Tags :