पुण्यात साकारतेय महिला गणेश मूर्तिकार

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उध्दारी ही म्हण पंचक्रोशीत गाजलेली आहे. स्त्रीने ठरविले तर काहीही करू शकते. सध्याच्या संगणकयुगात महिला कोणत्या क्षेत्रात आहेत याचा विचार करण्यापेक्षा कोणत्या क्षेत्रात नाहीत याचा विचार जास्त करावा लागेल. त्यातच एक उदाहरण पुण्यातल्या सुखसागर नगर मध्ये पहायला मिळतेय. गणेशमूर्ती घडविणाऱ्या रेश्मा रेवाळे यांच्या मुर्तीकलेकडे पाहून. काका गणेश मूर्तिकार असल्याने रेश्माने लहानपणापासून काकांच्या हाताखाली गणेशमूर्ती घडविण्याकरीता मदत करायच्या. लहानपणीच गणेशमूर्ती घडविण्याचे बाळकडू मिळाले. रंग कसे द्यायचे, रंगसंगती ठरविणे, विविध आकाराची संकल्पना या सगळ्याचा वारसा बाबांडून मिळाला. लहानपणी रंगसंगती चुकली, रंग इकडे तिकडे झाला तर बाबा ओरडायचे. त्यामुळे पुढे नेटकेपणाने काम करायला सुरवात केली.

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture