अखिल मंडई मंडळ गणपती

!!! जय शारदा गजानन !!!

स्थापनेचा इतिहास
ब्रिटीश राजवटीत १८८६ मध्ये तत्कालीन रे मार्केट पूर्ण झाले आणि भाजीपाल्याचा मोठा व्यापार सुरु झाला . साजीकच व्यापारी , शेतकरी , हमाल आणि भाजीविक्रेते यांचा राबता येथे सुरु झाला . येथील डोंगरे पैलवान काची यांना मुलबाळ नव्हते. तेव्हा त्यांनी तुळजापूरच्या भवानी मातेला नवस केला. आपत्य प्राप्तीझाल्यावर तुळजापुर मंदिराच्या कळसावर विराजमान असलेल्या शारदा गजाननाची मूर्ती बनून प्राणप्रतिस्थापना करण्याचा नवस होता . 

पुढे त्यांना आपत्यप्राप्ती झाली . मग त्यांनी शारदा गजाननाची मूर्ती बनून घेतली आणि गणेशाचा उत्सव सुरु झाला . उजव्या सोंडेची हि सिद्धीविनायेकाची श्री शारदा गजाननाची मूर्ती अबालवृद्धांच्या डोळ्यांचे पारणे फेडते . तर दर ३ वर्षांनी गणेशउत्सवात या गणेशाचा उत्सव हा झोपाळ्यावर बसवतात, या परंपरेमुळे हा गणपती " झोपाळ्यावरिल गणेश " म्हणूनही प्रसिद्ध आहे . आपल्या अखिल मंडई मंडळाची स्थापना १८८९४ झाली. त्या काळातील हि " ईको फ्रेंडली " मूर्ती आहे . चिंध्या, कागदाचा लगदा , लाकडाचा भुसा यांचा वापर तयार करून ती तयार करण्यात आली आहे . या परिसरात सर्कसचे खेळ होत असत . यापैकी एका सर्कस मधील हत्तीचे पिल्लू मरण पावले . त्याचा देह याच परिसरात पुरण्यात आला . त्याच भागात गणेशोत्सव साजरा केला जातो .

Tags :

#PuneGaneshFestival #Ganpati #PuneGanpati #अखिलमंडईमंडळ