तुळशीने दिला होता श्रीगणेशाला लग्न करण्याचा शाप, जाणून घ्या रोचक गोष्टी

कोणत्याही शुभकार्याच्या पूर्वी श्रीगणेशाची पूजा केली जाते. भगवान श्रीगणेशाचा जन्म कसा झाला आणि त्यांच्या मस्तकाच्या जागेवर कशाप्रकारे हत्तीचे मस्तक जोडण्यात आले या गोष्टी सर्वांनाच माहिती आहेत, परंतु श्रीगणेशाच्या संदर्भातील काही खास गोष्टी आजही अनेकांना माहिती नाहीत. गणेशोत्सवाच्या शुभ निमित्ताने आज आम्ही तुम्हाला श्रीगणेशाच्या काही रोचक गोष्टी सांगत आहोत.

- ब्रह्मवैवर्त पुराणानुसार एकदा देवी तुळस गंगा नदीच्या काठावरून जात असतात त्यांना श्रीगणेश तपश्चर्या करताना दिसले. श्रीगणेशाला पाहून देवी तुळशीचे मन त्यांच्याकडे आकर्षित झाले. तेव्हा तुळस श्रीगणेशाला म्हणाली की, तुम्ही माझे स्वामी व्हा परंतु श्रीगणेशाने तुळस देवीला लग्न करण्यास नकार दिला. नकार ऐकून रागात आलालेल्या तुळस देवीने श्रीगणेशाला लग्न करण्याचा शाप दिला आणि श्रीगणेशाने तुळशीला वृक्ष होण्याचा.

- ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवी पार्वतीने पुत्र प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत केले होते. या व्रताच्या फळ स्वरुपात भगवान श्रीकृष्ण पुत्र रुपात देवी पार्वतीला प्राप्त झाले.

- शिवमहापुराणानुसार देवी पार्वतीला श्रीगणेश निर्माण करण्याचा विचार जया आणि विजया यांनी दिला होता. जया-विजयाने देवी पार्वतीला सांगितले की, नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात. यामुळे तुम्हीही एका गणाची निर्मिती करा, जो फक्त तुमच्या आज्ञेचे पालन करेल. अशा प्रकारच्या विचाराने देवी पार्वतीने श्रीगणेशाची रचना केली.

- शिवमहापुराणानुसार श्रीगणेशाच्या शरीराचा रंग लाल आणि हिरवा आहे. श्रीगणेशाचे लग्न प्रजापती विश्वरूपच्या मुली रिद्धी आणि सिधी यांच्याशी झाले आहे. श्रीगणेशाला दोन पुत्र असून यांचे नाव क्षेत्र आणि लाभ आहेत.

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार जेव्हा सर्व देवा श्रीगणेशाला आशीर्वाद देत होते तेव्हा शनिदेवाची दृष्टी जमिनीकडे होती. पार्वतीने याबद्दल विचारले असता शनिदेव म्हणाले की, मी तुमच्या मुलाकडे पाहिल्यास त्याचे अहित होईल. परंतु देवी पार्वतीने सांगितल्यानंतर शनिदेवाने श्रीगणेशाकडे पाहिले तेव्हा त्यांचे मस्तक धडापासून वेगळे झाले.
 
 
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार एका कारणामुळे महादेवाने रागाच्या भारत सूर्यावर त्रिशुळाने प्रहर केला. या प्रहाराने सूर्यदेव चेतनाहीन झाले. सूर्यदेवाचे वडील कश्यप ऋषींना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी महादेवाला शाप दिला की, ज्याप्रकारे आज तुमच्या त्रिशुळाने माझ्या मुलाचे शरीर नष्ट झाले ठीक त्याचप्रमाणे तुमच्या मुलाचे मस्तक धडापासून वेगळे होईल. या शापाच्या प्रभावाने श्रीगणेशाचा मस्तकाची घटना घडली.

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार एकदा परशुराम जेव्हा महादेवाचे दर्शन घेण्यासाठी कैलासावर पोहचतात तेव्हा महादेव ध्यानस्थ असतात. तेव्हा श्रीगणेशाने परशुरामांना महादेवाला भेटण्यापासून आडवतात. यामुळे क्रोधीत झालेल्या परशुरामांनी श्रीगणेशावर आपल्या फरशा(एक प्रकारचे शस्त्र) ने वार केला. तो फारशा स्वतः  महादेवाने परशुरामांना दिला होता. श्रीगणेशाने तो वार व्यर्थ जाऊ नये म्हणून आपल्या दातावर घेतला, यामुळे त्यांचा एक दात तुटला. तेव्हापासून श्रीगानेसःला एकदंत म्हणून संबोधण्यात आले.

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture