गणेश चतुर्थीला शंकर महादेवन आपल्या मुलांसोबत घेऊन येतायत नवं गाणं 'गणपती बाप्पा पधारे'

मुंबई: गणेशोत्सव येत्या २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकानेच जय्यत तयारी सुरू केली आहे. आता याच मुहूर्तावर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन हे एक खास गाणं लॉन्च करणार आहेत. हे गाणं लॉन्च करताना शंकर महादेवन यांच्यासोबत त्यांना साथ देणार आहेत त्यांची दोन्ही मुलं शिवम आणि सिद्धार्थ.

 
 

झूम टीव्हीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शंकर महादेवन यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत शंकर महादेवन सांगत आहेत की, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शिवम महादेवन आणि सिद्धार्थ महादेवन या आपल्या दोन्ही मुलांसोबत मी एक नवं गाणं घेऊन येत आहे. या गाण्याचे बोल 'गणपती बाप्पा पधारे' असे आहेत. शंकर महादेवन यांचं 'गणपती बाप्पा पधारे' हे गाणं ऐकताच तुम्ही सुद्धा ताल धराल यात शंका नाहीये. शंकर महादेवन यांचं हे नवं गाणं पाहण्यासाठी तुम्ही झूम टीव्ही डॉट कॉमला भेट देऊ शकता.

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra,PravinTarde,RakeshBapat