विनायकी चतुर्थी

विनायकी हे संकष्टीप्रमाणेच एक सर्व कामनांना सिद्धिदायक असे व्रत आहे. 
प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थीस 'विनायकी चतुर्थी' असे म्हणतात. आपल्या पंचागात विनायकी व संकष्टी असे उल्लेख असतात. संकष्टीप्रमाणेच विनायकी हे व्रत आहे व ते गजाननाला प्रिय आहे. 
त्याचा पूजाविधी संकष्टीप्रमाणेच असतो. विनायक हे गणपतीचेच नाव आहे. 
 
*या दिवशी चंद्रदर्शन अथवा चंद्रपूजा याचा संबंध नसतो.*
 
या दिवशी दोन वेळा उपवास करावयाचा असतो. दुसरे दिवशी पारणे करतात. 
या व्रतसाधनाने सर्व विघ्ने, बाधा वगैरेचे निरसन होते व सर्व कामना परिपूर्ण होतात. गणपतीची कृपा होते. महान सिद्धिदायक असे हे व्रत आहे. संकटकाळी पुष्कळ लोक आपल्या संकटनाशनार्थ हे व्रत करतात व श्रीगजाननाला नवस बोलतात. या विनायकी ७, ११, २१, अशा ठरवून करावयाच्या असतात. 
यातही मंगळवारी येणारी विनायकी 'अंगारिका विनायकी; म्हणून हिचे महत्वही विशेष सांगितले आहे. एक 'अंगारिका विनायकी' चतुर्थी व्रत केल्यास सर्व वर्षातील विनायकी केल्याचे पुण्य मिळते, एवढे या योगाचे महत्व आहे.
या दिवशी सर्व पूजा नेहमीप्रमाणेच अथवा संकष्टीप्रमाणेच अथवा संकष्टीप्रमाणेच मंत्र म्हणून करावी. उपचार समर्पण करताना फक्त 
 *'श्रीसिद्धिविनायकाय नमः '*
असा निर्देश करावा.
-----------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी*

Tags :