‘रजतनगरी’ च्या क्रीडा क्षेत्रातील ‘वैभव; श्री हनुमान गणेशोत्सव मंडळ

स्थ शरीरातच स्वस्थ मन वास करते’ हा विचार बालमनावर बिंबवून क्रीडा क्षेत्रात रजतनगरी अर्थात खामगावचे नाव राज्यस्तरावर चमकविणारे  मंडळ म्हणून श्री हनूमान गणेशोत्सव मंडळाचा लौकिक आहे. विशेष म्हणजे याच मंडळातील अमोल ढिसले, प्रविण अवलकार, विजय घाडगे, राजु घोडेचोर, आकाश वायचाळ, गौरव बंदले, विक्की बंदले, प्रविण बंदले, रितेश पाल, राजु परदेशी आदी जवान सैन्यात देशसेवा करत आहेत. 
खामगाव शहरातील सतिफैल भागातील हनुमान व्यायाम गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९५२ साली झाली. मंडळाच्या स्थापनेनंतर हे  ६६ वे वर्ष आहे. या मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी क्रीडा मैदानावर वर्चस्व सिध्द केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पाच वर्षांनी स्व.फक्कुजी निंदाणे, स्व.नंदुमहाराज चव्हाण, स्व.आवटेजी तसेच दिनकरराव आमले, सुदामराव चव्हाण, रजपालसिंग चव्हाण, चंद्रकांत रेठेकर,  राम बोंद्रे, डिगांबर गलांडे, दर्शन ठाकूर यांनी परिसरातील युवकांना एकत्र आणले व हनुमान मंडळाची स्थापना केली. 
मागील ६६ वर्षांमध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध क्रीडा प्रकारात राज्यभरात मंडळासोबतच स्वत:चा नावलौकि केला आहे. मंडळाची अद्यावत व्यायामशाळा आहे. दररोज शेकडो तरूण येथे बलोपासना करतात.  शरीराबरोबरच बुध्दीचाही विकास व्हावा, यासाठी मंडळाच्या वतीने बालवाडी, वाचनालय चालविण्यात येते. दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कबड्डी, मल्लखांबच्या सामन्यांचे आयोजन या व्यायाम मंडळाच्या मैदानावर केले जाते. गणेश विसर्जन मिरवणूकीत युवकच नव्हे तर मंडळाच्या युवतींचा सक्रीय सहभाग असतो. यामध्ये मल्लखांब, फुगडी, मुलींचे लेझिम पथक, मुलींचे झांज  पथक, जिमनॅस्टीक, लाठी-काठीसह चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली जातात. मुलींचे लेझिम पथक व झांज पथक विसर्जन मिरवणुकीतील विशेष आकर्षण असते. शहरातील जुन्या मंडळांमध्ये गणल्या जाणाºया हनुमान मंडळाच्या वतीने वृक्षारोपण, गरीबांना कपडे वाटप, रोख मदत, व रक्तदान शिबीर असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाचे ३० ते ४० कार्यकर्ते राज्य व राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात चमकले आहेत. कबड्डीपटु सुरेंद्रसिह मेहरा यांनी अश्वमेध २०११  स्पर्धेत मंडळाचे नेतृत्व करून सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहे. सध्या मंडळाचे अध्यक्ष राम बोंद्रे हे असून यावर्षी विक्की घोडेचोर, किशोर बोर्डे, कुंदन यादव, धिरज यादव, गणेश कोमुकर, रविंद्र बोंद्रे, लखन रेठेकर, राजु ताकवाले, उमाकांत रेठेकर, जितेंद्रसिंग मेहरा, सुरज विभुते यांच्यासह विविध तरूण मंडळाची धुरा सांभाळत आहेत.

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture