गणेशोत्सव इतिहास

इतिहास

दहा दिवस चालणारा गणेशोत्सव पुण्यासह भारतातील अनेक राज्यांमध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात ऑगस्ट - सप्टेंबर दरम्यान साजरा केला जातो . हा उत्सव प्रचंड प्रमाणावर साजरा केला जात असून या देशाच्या संस्कृतीचे ते एक अंग ठरले आहे. १ ८ ९ ३ मध्ये पुण्यात सुरु झालेल्या या उत्सवाने एका परीने या शहराच्या वैभवशाली संस्कृतीत भर घालून तिची जोपासना करून तिला समृद्ध अवस्था प्राप्त करून दिली आहे. १ १ २ वर्षांच्या कालखंडात पुण्याचे रुपांतर मुळा-मुठा या नद्यांच्या खोर्यातील एका लहानशा वसाहतीपासून राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत झाले आहे. आणि अलीकडे या शहराने आयटी क्षेत्रात घेतलेली झेप पाहता त्याचे रुपांतर एका सायबर सिटीत झाले आहे. परंतु श्री गणेशाविषयी असलेले पुण्याचे असीम प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.

इतिहासाने हे खूप वेळा सिद्ध केले आहे कि बहुतेक देशांमध्ये धर्म हा निर्णयाक घटक ठरला असून भारत अशांपैकीच एक म्हणता येईल. यामुळे कदाचित समाजावर विपरीत परिणाम होऊ शकतात पण भारतात बहुतेकवेळा सामाजिक आणि आणि राजकीय विचार हातात हात घालून बरोबरीने नांदले आहेत.दहा दिवस चालणारा गणेशोत्सव हा एक असाच सण आहे,ज्याने धार्मिक स्वरुपापेक्षाही सामाजिक स्वरूप प्राप्त केले आहे.

१ ८ ९ २ मध्ये सरदार कृष्णाजी काशिनाथ उर्फ नानासहेब खासगीवाले यांनी ग्वाल्हेर मधील गणेशोत्सव पहिला. यापासून स्फूर्ती घेऊन त्यांनी पुण्यामध्ये गणेशो त्सव साजरा करायचे ठरवले. अशा प्रकारे १ ८ ९ ३ मध्ये घातावाडेकर आणि भाऊ साहेब रंगारी यांच्यासमवेत त्यांनी उत्सवाच्या पहिल्या वर्षाचे आयोजन केले.

३ गणेश मूर्ती स्थापन केल्या गेल्या आणि दहाव्या दिवशी त्यांची खासागीवाल्यांच्या गणपती अग्रभागी ठेऊन मिरवणूक काढली गेली. १ ८ ९ ४ मध्ये असे ठरले कि कसबा गणपती हा मानाचा राहील व जोगेश्वरी विश्वास्थांचा गणपती तिसरा राहील.

याचवेळी,राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ जहाल होत होती, मवाळ पक्षाचे लोक घटनात्मक पद्धत्तीने आपला मार्ग चोखाळीत होते पण लोकमान्य टिळकांना हे मान्य नव्हते. त्यांना जनजागृती करून क्रांतीसाठी लोकांना एकत्र आणायचे होते. लोकमान्य टिळकांनी गणेशोस्तावला चालना देण्याचे ठरवले. १ ८ ९ ४ मध्ये त्यांनी विन्चुरकारांच्या वाड्यामधे गणपतीची स्थापना केली आणि या उत्सवाला एक वेगळेच परिणाम लाभले. टिळकांनी समाजाला एकत्र आणण्याचे ठरवले आणि स्वातंत्र्य चळवळीने जोर धरला.

दहा दिवस चहूकडे भरगच्च कर्यक्रम झाले. भाषण,व्याखाने,भक्तीपर गीते आणि मेळे. यामुळे कवी, वक्ते , लेखक यांना स्फूर्ती मिळाली आणि जोडीला होती टिळकांची जोशपूर्ण व्याखान आणि त्यांच्या केसरी वार्तापत्रातील लेख.

सध्याची स्थिती

आज हा उत्सव बहुआयामी झालेला आहे. सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय आणि आर्थिक अशी परिणामे त्याला लाभलेली आहेत या उत्सवाचा खर्च लोकांकडून, स्थानिक दुकानदार आणि व्यापारीवार्गाकडून गोळा केलेल्या वर्गणीतून केला जातो. पूर्वी हे संकलन १ ० ० रुपयांच्या पुढे जात नसे. आज काही ट्रस्टसचे निधी संकलन कोटींमध्ये आहे. गणेश मंडळे ह्या राजकारणात जाऊ इच्छीनारया साठी प्रशिक्षण देणाऱ्या शाळा झाल्या आहेत. इथेच ते नियोजन कसे करावे, विविध प्रकारच्या लोकांना कसे कामाला लावावे , एक कल्पक व हिकमती व्यक्ती कसे बनावे, सामुदायिक जबाबदारी कशी स्वीकारावी आणि खरया नेतृत्वाची कला कशी साध्य करावी हे शिकतात . अर्थात आजही काही मंडळे व्यापक दृष्टीकोन ठेऊन सामाजिक उपक्रम हाती घेतात.

गंमतीची गोष्ट अशी कि गणेशोस्तवाने शहराच्या अर्थव्यव्स्थतेत योगदान दिलेले आहे. या उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये फुलाफळांचा खप तिप्पट वाढतो आणि मिठाईच्या विक्रीत सुमारे २ ५ % वाढ होते. प्रत्येकी ६ ० ० ० नारळांचे ६ ० ट्रक्स दक्षिणेकडून येतात आणि विसर्जनच्या मिरवणुकीसाठी ६ टन गुलाल वापरला जातो. सरासरी सत्तर ते दीडशे रुपयांच्या दरम्यान किंमत असलेल्या एक लाख गणेशमूर्ती दरवर्षी विकल्या जातात. गणेशमूर्ती साठी लागणाऱ्या प्लास्टर ऑफ प्यारीस आणि रंग यांची एकूण विक्री दीड कोटींपेक्षा जास्त होते. पुजासाहीत्यांची विक्री रु. २ ५ लाखांची होते. रोजगार निर्मितीही लक्षणीय आहे.

आपण काय करू शकतो

गणेश हे मानवाच्या विचारांचेच व्यक्त स्वरूप आहे. म्हणूनच सध्याच्या पिढीला तो कसा हवा,इथे एक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ज्या तर्हेने या उत्सवाने वळण घ्यायला सुरुवात केली आहे ते पाहता गणेशाचे रुपांतर एखाद्या करमणूक देवतेत होतंय कि काय अशी शंका येणे शक्य आहे. तरुणांच्या उधळ्या वागणुकीवर बरेच आक्षेप घेतले जातात पण इथे एक लक्षात ठेवन गरजेचं आहे कि ज्याप्रमाणे टिळकांनी गणेशोस्तवारील टीका सहन केली आणि टीकाकारांनी उत्सवात सहभागी होऊन त्यातील अनिष्ट गोष्टींचे परिमार्जन करावे असे आवाहन केले त्याचप्रमाणे नुसती बघ्याची भूमिका न घेता या उत्सवाचा एक भाग होणे अगत्याचे आहे. २ १ व्या शतकात गणेशाने आपल्याला सर्व प्रकारचे चांगले आशीर्वाद द्यावे त्याने आपले दृष्ट कृती करण्यारया द्रुष्ट विचारांपासून सरंक्षण करावे, आपला जातीयवाद, दहशतवाद नष्ट करून एकत्र राहण्याची सुबुद्धी द्यावी. " म्हणूनच श्री गणेशा चरणी हीच प्रार्थना कि बाप्पा पुण्यासह अशीच तुझी कृपादृष्टी साऱ्या जगावर राहू दे."