संकेत स्थळाबद्दल

पुण्यास महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे संबोधले जाते. पुण्यात वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. पुणेकरांना उत्सव, परंपरा, संगीत, कला, साहित्याची विशेष आवड आहे. इ. स. १८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यातही पुण्याचा पारंपारिक गणेशोत्सव विशेष प्रसिध्द झाला. भाद्रपद महिन्यात म्हणजेच ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येणार्‍या या सणाच्या दहा दिवसांत पुणे शहरातील अवघे वातावरण चैतन्यमय होऊन जाते. फक्त भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. शहरात जागोजागी लहान-मोठी गणेश मंडळे असून ते मंडप उभारुन सामाजिक-ऐतिहासिक देखावे सादर करतात. दहा दिवस चालणाऱ्या उत्सवास विसर्जनाने बाप्पांना निरोप दिला जातो. अनंत चतुर्दशीला सकाळी सुरू होणारी विसर्जन मिरवणुक पुढच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत चालते. या साऱ्या गोष्टींवरून पुणेकरांच्या दैनंदिन जीवनात गणेशोत्सवाचा प्रभाव सहज जाणवणारा आहे. आज हे शहर एक आय.टी. सिटी म्हणुन ओळखले जाते. तंत्रज्ञानामुळे इंटरनेटवरून दूर-दूर पर्यंत पसरलेल्या लोकांना जवळ आणण्याचे महत्वाचे कार्य साधले गेले आहे. त्यामुळे शहरे, देश, नातेवाईक एकमेकांशी सहज जोडली जातात. म्हणजेच माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगात इंटरनेट हे महत्वाचे साधन आहे. यासाठीच या साधनाचा वापर करून जगप्रसिद्ध असलेल्या गणेशोत्सवाचे विविध पैलू जगभरात पोहोचवण्यासाठी ''संकल्प डिझाइन्स'' संस्थेने